अनुप हा प्रो कबड्डीमधील सर्वात वलयांकित खेळाडूंपैकी एक आहे. प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार, बोनस किंग, कॅप्टन कूल म्हणून सर्वांना परिचित असणारा अनुप कुमार यंदाच्या मोसमात जयपूर पिंक पँथर संघासाठी करारबद्ध झाला आहे. त्याने सलग पाच मोसमात यु मुंबा संघाचे कर्णधारपद भूषवले होते. पहिल्या तीन मोसमात यु मुंबाला सलग तीन वेळा अंतिम फेरी गाठून दिली होती. दोन वेळा उपविजेतेपदावर तर एकवेळा विजेतेपदावर त्यांना समाधान मानावे लागले होते.
आज अनुप आपल्या अगोदरच्या संघाविरुद्ध सामना खेळायला उतरेल तेव्हा त्याला प्रो कबड्डीमधील केवळ पाचवा खेळाडू ठरण्याची एक मोठी संधी आहे. अनुप कुमारने प्रो कबड्डीमध्ये ७८ सामन्यात खेळताना ५४६ गुण मिळवले आहेत. त्यात त्याने ४८९ रेडींग गुण मिळवले आहेत तर ५७ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. आजच्या सामन्यात जर त्याने रेडींगमध्ये ११ गुण मिळवले तर तो ५०० रेडींग मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील होईल. अशी कामगिरीत करणारा तो पाचवा खेळाडू ठरेल.
आज जयपूर विरुद्ध यु मुंबा सामन्यात जेव्हा अनुप कुमार या सामन्यात खेळण्यास उतरेल तेव्हा तो प्रथमच यु मुंबा संघाच्या विरोधात खेळले. ज्या संघाला त्याने पाच वर्षे दिली आणि ज्याच्यामउळे त्या संघाला वेगळी ओळख मिळाली त्या संघाविरुद्ध तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचा ठरणार आहे. ‘बोनस किंग’ या नावाने देखील अनुप कुमारला प्रो कबड्डीमध्ये ओळखतात. यु मुंबा विरुद्ध हा ‘बोनस किंग’ जयपूरसाठी बोनस ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.