- अमेरिकेची पाकिस्तानला सूचना
वॉशिंग्टन – काबुल मधील इंटरकॉन्टिन्टेल हॉटेलवर झालेल्या हल्ला प्रकरणाला जबाबदार असलेल्या तालिबानी नेत्यांना पाकिस्तानने एकतर तातडीने अटक करावी अन्यथा त्यांना त्वरीत देशाबाहेर घालवून द्यावे अशी सुचना अमेरिकेने केली आहे. तालिबानी नेते त्यांच्या हस्तकामार्फत पाकिस्तानी भूमीचा दहशतवादासाठी सातत्याने वापर करीत आहे त्यांना प्रभावी पायबंद घालण्याची सूचनाहीं त्यांनी केली आहे.
इंटर कॉन्टिनेंटल हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात 22 जण ठार झाले होते. अफगाण सरकारनेही या हल्लेखोरांच्या विरोधात प्रभावी कारवाई केली पाहिजे अशी सुचना त्यांनी केली आहे. अफगाणिस्तानातील आमच्या शत्रुंना नेस्तानबूत करण्यासाठी आम्हीही अथकपणे प्रयत्न करू असेही अमेरिकेने म्हटले आहे.