जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी बॅडमिंटनमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यानंतर आज अॅथलेटिक्सकडे सर्वांचे लक्ष्य होते. अॅथलेटिक्समध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.
धरूण आय्यासामी या भारतीय खेळाडूने 400 मीटर अडथळ्यांची शर्यत या क्रीडाप्रकारात दमदार कामगिरी करत दुसरे स्थान पटकावित भारताला रौप्यपदक जिकूंन दिले आहे. त्याने 400 मी. अडथाळ्यांच्या शर्यतीमध्ये 48.96 सेकंद अशी वेळ नोंदवत पूर्ण केली. तर दुसरीकडे महिला स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधा सिंग हिने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकाविले आहे.