लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पवन एक्स्प्रेसचे इंजिन अवरोधक भेदून थेट प्लॅटफॉर्मवर चढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
सोमवारी पहाटे चारच्या सुमारास पवन एक्स्प्रेसचे इंजिन अवरोधक भेदून प्लॅटफॉर्मवर चढल्याची घटना घडली. यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधून सुटणाऱ्या काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे समजते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेवर मध्य रेल्वेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.