त्सुनामीचा तडाखा बसलेल्या इंडोनेशियामध्ये मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत येथे 281 जणांचा मृत्यू झाला असून एक हजाराहून जास्त लोक जखमी आहेत. अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या लाटांचा जबर तडाखा किनाऱ्यांवरील शेकडो हॉटेले, घरे आणि इमारतींना बसला. काही क्षणांतच होत्याचे नव्हते होऊन गेले. या किनारपट्टीवर सगळीकडे उद्ध्वस्त झालेली घरे, पडलेली हॉटेले, इतस्ततः विखुरलेले सामान असे दृश्य दिसत होते. हजारो घरे उध्वस्त झाल्यामुळे लोकं रस्त्यावर आली आहेत. तसेत जागोजागी भूस्खलन झाल्यामुळे अनेकजण अद्याप बेपत्ता असल्याचे समजते. स्थानिक प्रशासनाने मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे.