मूळ ब्रिटनची असलेली भारतीय वंशाची बनिता संधू वरुण धवनबरोबर “ऑक्टोबर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. पण बॉलिवूडमध्ये कोणत्याही एकाच ढंगाच्या भूमिकांच्या साच्यामध्ये अडकण्याची तिची इच्छा नाही. तिला व्यवसायिक सिनेमा आवडतो. त्यासाठी चांगल्या सिनेमाचा ती सारखा शोध घेते आहे. सिनेसृष्टीमध्ये अनेक चांगले लोक, चांगल्या कलाकृती करत असतात. मात्र त्यांच्याबाबत लोकांचे दृष्टीकोन सतत चांगले असतातच असे नाही. व्यवसायिकतेचे निकष लावले, तर प्रत्येक गोष्टीला चांगले किंवा वाईट म्हणता येऊ शकणार नाही.
व्यवसायिक सिनेमा बघतच बनिता लहानाची मोठी झाली. काही चांगल्या दिग्दर्शकांच्या चांगल्या कलाकृती तिने बघितल्या. त्यामुळे चांगली रचनात्मक कलाकृती करण्यासाठी अशा चांगल्या लोकांबरोबर काम करणे आवश्यक आहे, हे तिच्या लक्षात आले आहे. “ऑक्टोबर’मध्ये तिला हॉटेलमधील ट्रेनीचा रोल करायचा होता. हॉटेलमधील एका अपघातादरम्यान ती कोमामध्ये जाते, एवढाच तिला अभिनयाला वाव होता. पण “ऑक्टोबर’मधील तिचा रोल तिला फार मोठी संधी देणारा होता, असे म्हणता येणार नाही. पण बॉलिवूडमध्ये शिरकाव करण्यासाठी ही संधी पुरेशी होती, असे तिला वाटते.
मूळची पंजाबी असलेल्या बनिताला दलजीत दोसांजच्या “जिंद माही’च्या शुटिंगसाठी लंडनला जायला लागले. म्युजिक व्हिडीओमध्ये काम करण्याचा तिचा पहिलाच अनुभव होता. दलजीत दोसांजच्या म्युजिकची ती चांगलीच फॅन आहे. “उडता पंजाब’ हा तिचा अगदी फेव्हरेट सिनेमापैकी एक आहे.
सध्या तरी बनिताकडे बॉलिवूडमधील कोणताही सिनेमा नाही. इतक्यात नवीन सिनेमा मिळण्याची कोणतीही शक्यताही नाही. अशावेळी आपला रिकामा वेळ चांगल्या सिनेमातील चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी त्यिला घालवायचा आहे.