अभिनेता रणवीर सिंह हा नेहमीच त्याच्या दिलखुलास अदांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतो. आपण काम करत असलेल्या चित्रपटासाठी हंड्रेड पर्सेंट परिश्रम देणे हे त्याच्या यशाचे खरे ‘सिक्रेट’ असल्याचे तो सांगत असतो. आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेत एकसंघ होऊन काम करण्याच्या त्याच्या सवयीमुळेच त्याची प्रेक्षकांमध्ये देखील वाहवाह होत असते.
कामाचा इतका व्याप असताना देखील रणवीर ‘सोशल मीडियाकडे’ मात्र अजिबात दुर्लक्ष करत नाही. सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत राहण्यात रणवीरचा हातखंडा आहे. सध्या रणवीर रोहित शेट्टी दिग्ददर्शित सिम्बा चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.
दरम्यान सिम्बाच्या शुटिंगवेळी रणवीरने गोलमाल चित्रपटातील स्टारकास्ट बरोबर एक व्हिडीओ तयार केला असून त्यामध्ये तो गोलमलच्या रंगामध्ये रंगत ‘गोलमाल’ स्टाईल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.