तेलंगणात पुन्हा एकदा के. चंद्रशेखर राव यांची तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. सध्याच्या अंदाजानुसार, टीआरएसने सर्वाधिक ९० जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या निकालांवर संशय व्यक्त केला आहे. इव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असून त्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे काँग्रेस नेते उत्तमकुमार रेड्डी यांनी म्हटले आहे.
