नवी दिल्ली – परदेशी तुरूंगांमध्ये 7 हजार 737 भारतीय कैदेत आहेत. नेपाळमधील तुरूंगांमध्ये 541 तर पाकिस्तानमधील तुरूंगांत 471 भारतीय आहेत, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. आखाती देशांमध्ये तब्बल 4 हजारर 604 भारतीय कैदेत आहेत.
शिक्षेची मुदत संपूून सुटका झालेल्या भारतीयांना मायदेशी परतण्यासाठी भारतीय दूतावासांकडून सर्वतोपरी मदत केली जाते. त्यांना विमानभाडेही पुरवले जाते. दरम्यान, मागील वर्षी 13 देशांमध्ये 56 भारतीयांवर हल्ले झाले. तर चालू वर्षी 17 देशांत 31 भारतीयांवर हल्ल्याच्या घटना घडल्या, असेही सिंह यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.