वॉशिंग्टन- बब्बर खालसा ही दहशतवादी संघटना संपूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे विधान अमेरिकेने केले आहे. भारतात स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारी, आणि अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले करणारी बब्बर खालसा ही दहशतवादी संघटना संपूर्ण जगासाठीच धोकादायक असल्याचे बाबत व्हाईट हाऊसने जारी केलेल्या एका रणनीतिक दस्तावेजावरील चर्चेच्या वेळी व्हाईट म्हटले आहे.
बब्बर खालसा ही संघटना देश तोडणारी आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय हेतून तिने हत्या केलेल्या आहेत आणि कारवाया करत आहे. हिंसा आणि दहशतवादाच्या माध्यमातून निर्दोष नागरिकांच्या जिवाशी खेळणारी बब्बर खालसा अमेरिकेसाठीही धोकादायक आहे, असे अमेरिकन सरकारच्या रणनीतिकारांचे म्हणणे आहे.
अमेरिका, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांमध्ये बब्बर खालसावर बंदी घालण्यात आलेली आहे.
परदेशांत क्रांतिकारी, राष्ट्रवादी, आणि फुटीरवादी आंदोलनांची एक मोठी मालिकाच आहे. हिंसाचाराने समाज अस्थिर बनवणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांचे जीवनही धोक्यात घालू शकतात. अमेरिकेने सादर केलेल्या या दस्तावेजात लष्कर-ए-तैयबा आणि एलटीटीई यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागर जॉन बोल्टन यांनी हा दस्तावेज सादर केला आहे.