नालासोपारा- नालासोपारा येथील भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. रुपाली चव्हाण (वय 32) असे तिचे नाव आहे.
रुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नालासोपारा पश्चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमधील बी विंगच्या 101 नंबर फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.
महत्त्वाचे म्हणजे त्यांची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. त्यांच्या शरीरावर वार केले आहेत. तसेच इस्त्रीचे चटके आणि शॉकही दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.