वाकड – पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानित करण्यात आला. संघा तर्फे प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह व प्रोत्साहनपर धनादेश देण्यात आला. हा कार्यक्रम थेरगाव येथील प्रेरणा विद्यालयात झाला. प्राचार्य यशवंत पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर कला-गुणांना वाव देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे व शिस्तीलाही महत्व दिले पाहिजे, कारण शिस्तपालन हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. प्रत्येक काम वेळेत आणि नियमात करण्याची सवय मुलांनी स्वतः लावून घेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षक व आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकायलाच हव्यात. प्राचार्य यशवंत पवार, पर्यवेक्षक धनसिंग साबळे, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, प्राथमिक विभागाचे पर्यवेक्षक अशोक खताळ, उमेश आगम यावेळी उपस्थित होते. निबंध स्पर्धेत वैभव चांदुरे, ऋत्विक पाटील, ऋतुजा धर्मे, प्रिती म्हेत्रे यांना चित्रकला स्पर्धेत ओंकार कीर्दत, प्रल्हाद बिडवे, साक्षी जानराव, ऋतुजा मोराळे, पार्थ जोशी, प्रकाश बनसोडे यांना व वक्तृत्व स्पर्धेत शुभम शिंदे, ऋतुजा धर्मे, प्रेरणा कांबळे, तनुजा तळीखेडे यांना पुरस्कार देण्यात आला. क्रीडाशिक्षक रमेश कदम यांनी सूत्रसंचालन, भीमराज शिरसाठ यांनी प्रास्ताविक व अरुणा यशवंते यांनी आभार मानले. अनिल नाईकरे, अर्जुन शेटे, पांडुरंग दिवटे, दिलीप माळी, दादा शेजाळ, विजय जाधव, पुरुषोत्तम पाटील, दत्तात्रय उबाळे, संगिता दगडे, बिपिन देशमुख, अर्चना कदम, सुचेता गुजरे यांनी नियोजन केले.
