कोलकाता- मणिपुरने अरुणाचल प्रदेशचा केवळ दीड दिवसात पराभव करत रणजी क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांच्या 23 विकेट्स पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी उर्वरीत 17 विकेट पडल्या आणि सामना मणिपुरने 112 धावांनी आपल्या नावे केला आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना मणिपुरला 26 षटकांमध्ये सर्वबाद 85 धावांचीच मजल मारता आली. तर, प्रत्युत्तरात उतरलेल्या अरुणाचल प्रदेशचा पहिला डाव 23.3 षटकांत सर्वबाद 66 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे मणिपुरला पहिल्या डावात 19 धावांची आघाडी मिलाली होती. यावेळी दुसऱ्या डावात मणिपुरने 56 षटकांत सर्वबाद 253 धावांची मजल मारत अरुणाचल प्रदेश समोर विजयासाठी 273 धावांचे आव्हान ठेवले. यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या अरुणाचल प्रदेशचा दुसरा डाव 37.3 षतकांत 160 धावांमध्येच संपुष्टात आल्याने मणिपुरने हा सामना 112 धावांनी आपल्या नावे केला.