गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय संघाने शानदार खेळ करत मलेशियाला हरवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मुकाबला बरोबरीत सुटल्याने भारताला झटका जरुर बसला होता मात्र वेल्सला हरवत भारताने शानदार पुनरागमन केले. मलेशियाविरुद्धचा सामना जिंकत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
भारताने मलेशियाला २-१ने हरवले. हरमनप्रीतने तिसऱ्या आणि ४४व्या मिनिटात गोल केला. तर मलेशियाकडून फैजल सारीने १६व्या मिनिटाला गोल केला. हरमनप्रीतने दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले.
भारताने सामन्याची सुरुवात दमदार केली आणि तिसऱ्याच मिनिटात आघाडी घेतली. तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हरमनप्रीतने गोल केला आणि भारताला १-० अशी आघाडी मिळाली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने ही आघाडी कायम राखली.