पिंपरी – “तु माझ्याशी का बोलत नाहीस’, असे म्हणत तरूणीचा हात धरून एका तरूणाने विनयभंग केला, तर त्याच तरूणाने दोन महिन्यांपूर्वीही त्याच तरूणीचे केस ओढून गालावर चापट मारली होती. विनयभंगाच्या या प्रकरणी संबंधित तरूणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
सचिन रोहिदास म्हस्के (वय-22, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी एका सतरा वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी तरूणी व तिची मैत्रीण दुचाकीवरून असताना पाठीमागून आलेल्या आरोपीने मतु माझ्याशी का बोलत नाहीस, मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत फिर्यादी तरूणीचा हात धरून विनयभंग केला. त्याचबरोबर तिला बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार वल्लभनगर येथील एसटी स्टॅंडजवळ घडला. दररोज होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरूणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.