वाकड- वाकड परिसरातील लॉरेल हौसिंग सोसायटीने राबवण्यात आलेल्या सौरउर्जा व खतनिर्मिती प्रकल्पाचे स्थायी समिती सभापती ममता गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सोसायटीमधील सभासद उपस्थित होते.
या प्रकल्पाविषयी वाकड परिसरात स्थायी समिती सभापती ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी सर्व सोसायटी मध्ये बैठक घेऊन सौर उर्जा, खत निर्मिती, कचरा विलगीकरण आदी प्रकल्प राबविण्याकरिता नागरिकांच्या हिताच्या व पर्यावरणाच्या दृष्टीने हे प्रकल्प सोसायटी मध्ये राबविण्यासाठी प्रोत्साहन देऊन जनजागृती करण्यात आलेली होते.
आज या सोसायटी मधील सौरऊर्जा व खतनिर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. लॉरेल सोसायटीमधील सर्व सभासदांच्या प्रयत्नांनी असे प्रकल्प राबवत असून येथील सर्व सभासदांचे सहकार्य याकरिता महत्वाचे आहे. याठिकाणी सौरउर्जा प्रकल्प गेले काही महिने चालू असून यातून त्यांच्या सोसायटीची जवळ जवळ ७५ टक्के वीज बचत होत आहे. तसेच येथील सभासद खत निर्मिती प्रकल्प आपल्या सोसायटीमध्ये राबवत असून १०० टक्के कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावत आहेत. याबाबत सोसायटीमधील सर्व सभासदांचे अभिनंदन केले करण्यात आले.
यावेळी बोलताना स्थायी समिती सभापती ममता गायकवाड म्हणाल्या की वाकड परिसरात सर्व सोसायटीमध्ये हे प्रकल्प राबविण्याकरिता आम्ही स्वतः जाऊन जनजागृती केली होती. आज लॉरेल सोसायटीने हे प्रकल्प राबवून सर्व सोसायटी धारकांसाठी एक मॉडेल तयार केलेले आहे. या लॉरेल सोसायटीचा वाकड परिसरातील व आजूबाजच्या सोसायटीमधील नागरिकांनी आदर्श घेऊन असे जनहिताचे व पर्यावरणपूरक प्रकल्प राबवावेत. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांनी असे प्रकल्प आपापल्या सोसायटीमध्ये राबवावेत. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे अशा सोसायटींना करसवलत देण्यात येते व आपल्या सोसायटीसाठी देखील असे प्रकल्प हितकारक आहेत. असे प्रकल्प राबवून या परिसरातील नागरिकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. याकरिता लॉरेल सोसायटी व येथील सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रामदास कस्पटे, सोसायटीचे चेअरमन कवलजित कौर सेठी, सेक्रेटरी मनोज कुमार सिन्हा, कमिटी सभासद असिफ जैन, विशाल लाड, अमित मित्तल, प्रतिक ठक्कर व सोसायटीचे सभासद उपस्थित होते.