नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या फॅनने खुले आव्हान दिले आहे. यामध्ये विराटला १० वर्षात रिप्लेस करण्याचं आव्हान त्याच्या फॅनने दिले आहे. पंजाब आणि बंगळुरुच्या सामन्या दरम्यानाचा हा फोटो आहे. सध्या हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
लहान मुलाच्या हातात एक पोस्टर आहे. त्या पोस्टरवर ‘हैलो विराट सर, अगले 10 साल में आपको रिप्लेस करने का वादा करता हूं, बेस्ट ऑफ लक,’ असे लिहण्यात आले आहे. सोशल मीडियावर या फोटोवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.