सध्या बॉलिवूडची क्विन ऐश्वर्या राय बच्चनचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. पण ऐश्वर्याच्या या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उभे केले आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये ऐश्वर्याने लाल रंगाचा प्लेन साधा, सिंपल पण आकर्षक असा ड्रेस परिधान केला आहे. ऐश्वर्याच्या या ड्रेसिंग स्टाईलवरुन ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.
ऐश्वर्याच्या या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती अभिषेक बच्चन दिसत आहे. त्यांचा हा फोटो देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांची बहिण नीना कोठारीच्या मुलच्या प्री-विडेंगी पार्टीमधील आहे. या पार्टीला अभिषेक बच्चनने काळ्या रंगाचा सूट आणि ऐश्वर्याने लाल रंगाचा बॉलिवूडमधील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला आहे. दरम्यान ऐश्वर्याने ड्रेसच्या ओढणीने पोट झाकले आहे. या स्टाईलमुळे ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे.
