मुंबई – राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर कडू यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या वाहनांसमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या आंदोलनामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावर्षी परतीचा पाऊस आणि नंतर अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने राज्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र राज्यात सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य तो निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने राज्यपालांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेची दखल घेऊन राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती.

Maharashtra: Farmers in Mumbai staged a protest today, against the crop loss due to untimely rains. They were later detained while marching towards the Raj Bhavan.
1701:04 PM – Nov 14, 2019Twitter Ads info and privacy25 people are talking about this
तसेच शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीचे गांभीर्य राज्यपालांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांनी आज मुंबईत मोर्चा काढला. राजभवनाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळले.